‘आर्टिकल 15’ची बॉक्स ऑफिसवर जोरदार चलती

नवी दिल्ली- बॉलिवूड अभिनेता ‘आयुष्मान खुराणा’च्या ‘आर्टिकल 15’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तीन दिवसात तब्ब्ल 20 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

चित्रपटाने शुक्रवारी 5.02 कोटी, शनिवारी 7.25 कोटी तर, रविवारी 7.77 कोटींची कमाई केली असून, चित्रपटाने आतापर्यंत 20.04 कोटी रुपयांची जोरदार कमाई केली आहे.

‘आर्टिकल 15’ चित्रपटात आयुष्मान बरोबर ईशा तलवार, सयानी गुप्ता, मोहम्मद जीशान अय्यूब आणि कुमुद मिश्राही मुख्य भूमिकेत आहेत. ‘आर्टिकल 15’ या सिनेमाची कथा उत्तर प्रदेशातील सत्य घटनेवर आधारित आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.