मुंबई- मुंबईतील आर्थर रोड कारागृहातील स्वयंपाक करणाऱ्या महिलेला कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्या संपर्कात आलेल्या 77 कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
त्यांचबरोबर 26 पोलीसांचे देखील कोरोनाचे अहवाल पाॅसिटिव्ह आले आहेत. या सगळ्यांना बृहमुंबई महानगर पालिकेच्या सहकार्याने सेंट जाॅर्ज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून ठाण्यातील आठ कारागृहे क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांची निवासाची आणि जेवणाची व्यवस्था कारागृहातच करण्यात आली होती.