मुंबई – कला क्षेत्रात पाऊल ठेवल्यानंतर प्रत्येक अभिनेत्याचं स्वप्न असतं आयुष्यात एकदातरी आपल्या ‘फिल्मफेअर’ पुरस्कार मिळावा. यासाठीच अनेक कलाकार रात्रंदिवस मेहनत घेत असतात. यंदाचा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा हा गुवाहाटी इथं पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी संपूर्ण बॉलिवूड गुवाहाटी मध्ये दाखल झालं आहे.
आता या भव्य-दिव्य सोहळ्याची रंगीत तालीम सुरु झाली असून, अभिनेता ‘रणवीर सिंग’ने या दरम्यानचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फिल्मफेअरच्या स्टेजवर मधोमध रणवीर उभा आहे. या फोटोखाली त्याने गली बॉय चित्रपटातील एक डॉयलॉग कॅप्शनमध्ये लिहिला आहे.
View this post on Instagram
“कलाकार मैं, कल को आकार दूँ, यही है मेरा धर्म, मेरी दूसरी कोई जात ना’ (कलाकार मी, उद्याला आकार देईन… हाच माझा धर्म, माझी दुसरी कोणती जात नाही) असं रणवीर म्हणतो. या सोहळ्यात रणवीरचा जबरदस्त असा डान्स परफॉर्म असणार आहे.