टी-20 विश्वचषक २०२४ चा दुसरा उपांत्य सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात २७ जून रोजी पडला. या सामन्यात भारताने इंग्लंडकडून गेल्या टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेतला. भारतीय संघाने उपांत्य फेरीत इंग्लंडचा पराभव करून T20 विश्वचषक २०२४ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या सामन्यात गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. यावेळी भारताचा डावखुरा फास्ट गोलंदाज अर्शदीपने एका T20 विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे.
अर्शदीप सिंगने आता ICC T20 विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम केला आहे. अर्शदीप सिंगने T20 विश्वचषक २०२४ मध्ये आतापर्यंत ७ सामने खेळले आहेत. या ७ सामन्यात त्याने ७.५० च्या इकॉनॉमीने १५ विकेट घेतल्या आहेत. यानंतर जसप्रीत बुमराह दुसऱ्या क्रमांकावर,आरपी सिंग तिसऱ्या क्रमांकावर आणि रविचंद्रन अश्विन चौथ्या क्रमांकावर आहेत.
टी-20 विश्वचषक २०२४ मध्ये जसप्रीत बुमराहने आतापर्यंत ७ सामने खेळले आहेत. या ७ सामन्यात त्याने ४.१२ च्या इकॉनॉमीसह १३ विकेट घेतल्या आहेत. आरपी सिंगने २००७ च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये ७ सामने खेळले होते. या ७ सामन्यांमध्ये त्याने ६.३३ च्या इकॉनॉमीसह १२ विकेट्स घेतल्या. रविचंद्रन अश्विनने टी-20 विश्वचषक २०१४ मध्ये ६ सामने खेळले. या ६ सामन्यांमध्ये त्याने ५.३५ च्या इकॉनॉमीसह ११ विकेट घेतल्या.