बहुचर्चित ‘बच्चन पांडे’मध्ये अर्शद वारसीची एंट्री

बॉलीवूडमधील ऍक्‍शन हिरो अर्थात अक्षयकुमार लवकरच आगामी “बच्चन पांडे’ चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे. या चित्रपटात कृती सेनॉनची मुख्य नायिका म्हणून निवड करण्यात आली असून आणखी एका स्टार-कलाकाराची एंट्री झाली आहे. तो कलाकार म्हणजे अर्शद वारसी. “बच्चन पांडे’मध्ये ऍक्‍शनसोबतच कॉमेडीदेखील पाहावयास मिळणार आहे.

यामुळे अक्षयबरोबर चांगला कॉमिक टाइमिंग असलेल्या कलाकाराचीही गरज होती. यासाठी अभिनेता अर्शद वारसी यांच्यापेक्षा अन्य चॉइस कोणती असणार. अर्शदने अनेक चित्रपटांत कॉमिकची दमदार भूमिका साकारल्या आहेत. मग त्या “गोलमाल’ सिरीज असो की “मुन्नाभाई’मधील सर्किटची भूमिका असो. यातून त्याने प्रेक्षकांचे मनसोक्‍त मनोरंजन केले होते. आता अर्शद पहिल्यांदाच अक्षयसोबत काम करणार आहे.

या चित्रपटाचे शूटिंग राजस्थानमधील जैसलमेर येथे करण्यात येणार असून यासाठी लवकरच लोकेशन निश्‍चित करण्यात येणार आहे. हे शूटिंग पुढील वर्षात जानेवारी ते मार्चपर्यंत करण्यात येणार आहे. साजिद नाडियादवाला यांच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी करणार आहेत.

“बच्चन पांडे’मध्ये अक्षयकुमार हा एक गॅंगस्टारची भूमिका साकारत असून तो अभिनेता बनू इच्छित असतो. तर कृती सेनॉन एका पत्रकाराच्या भूमिकेत झळणार आहे, जी चित्रपटाची डायरेक्‍टर बनू इच्छित असते. यातून चाहत्यांना चित्रपटात ऍक्‍शन आणि विनोद पाहावयास मिळणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.