पिरंगुट (वार्ताहर) -गणपती बाप्पा मोरया…मंगलमूर्ती मोरया, मोरया… मोरयाच्या जयघोषात मुळशी तालुक्यात सर्वत्र गणरायाचे आगमन झाले. ढोल-ताशा झांज, बॅंडच्या मंगलमय स्वरात पारंपरिक वाद्याच्या गजरात गणरायाचे घरोघरी आगमन झाले.
तालुक्यात विविध ठिकाणी सोमवरी (दि. 2) सकाळपासूनच गणेशभक्तांची रेलचेल सुरू होती. गणेशमूर्ती खरेदीबरोबरच पूजेचे साहित्य व विविध वस्तू घेण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती.
पिरंगुट, माताळवाडी फाटा, घोटावडेफाटा, पौड, घोटावडे, पौड आदी ठिकाणच्या बाजारपेठात मोठी गर्दी झाली होती. दुपारनंतर सार्वजनिक गणेश मंडळांनी आगमन मिरवणुका सुरू केल्या.
घरगुती गणपती बरोबरच सार्वजनिक मंडळाचे गणपती, विविध सोसायट्या, शाळा महाविद्यालय, तसेच परिसरातील अनेक औद्योगिक कारखान्यात वाद्याच्या गजरात गणरायाचे आगमन झाले. पुढील दहा दिवस ाच्या मंगलमय उत्सवामुळे चैतन्य पसरले आहे.