मुंबई – आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत असलेल्या अंबानी कुटुंबात चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक मुकेश अंबानी हे आजोबा आणि पत्नी नीता अंबानी या आजी झाल्या आहेत. मुकेश आणि नीता यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी हे बाबा झाले आहेत.
आकाश अंबानीची पत्नी श्लोका हिने आज 10 डिसेंबर रोजी गोंडस मुलाला जन्म दिला. सोशल मीडियावर आकाश आणि श्लोका या जोडीला शुभेच्छा मिळत आहेत.
मुकेश अंबानींचा मुलगा आकाश आणि श्लोकाचा विवाह 9 मार्च 2019 ला झाला होता. आता या जोडप्याला मुलगा झाला आहे. श्लोकाने आज सकाळी 11 वाजता एका गोंडस मुलाला जन्म दिला.याबाबत अंबानी कुटुंबाच्या प्रवक्त्यांनी माहिती दिली आहे.
भगवान श्री कृष्णाच्या आशीर्वादाने श्लोका आणि आकाश अंबानी हे आई-बाबा झाले आहेत. मुकेश आणि नीता अंबानी पहिल्यांदा आजी-आजोबा झाले असून कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे, असे प्रसिद्धीपत्रक अंबानी कुटुंबाकडून जारी करण्यात आले आहे. तसेच आई व मुलाची तब्येत ठणठणीत आहे. नव्या पाहुण्याच्या आगमनामुळे मेहता आणि अंबानी कुटुंबात आनंदाची लाट आली आहे.