पंजाबमध्ये दोन पाकिस्तानी नागरिकांना अटक

फिरोजपूर: पंजाबमध्ये संशयास्पदरित्या फिरणाऱ्या दोन पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली. ती कारवाई भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी सोमवारी सायंकाळी केली.
मोहम्मद लतिफ आणि मोहम्मद सैफ अशी पकडण्यात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांची नावे आहेत. आंतरराष्ट्रीय सीमा (आयबी) ओलांडून त्यांनी भारतीय हद्दीत प्रवेश केला. पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यात घुसखोरी केलेल्या त्या संशयितांना बीएसएफ जवानांनी हेरले. त्यांना तातडीने पकडण्यात आले. त्यांची कसून चौकशी केली जात आहे. दरम्यान, दुसऱ्या घटनेत बीएसएफच्या जवानांनी हेरॉईन या अंमली पदार्थाचा दीड किलो साठा जप्त केला. ते हेरॉईन पाकिस्तानमधून तस्करी मार्गाने आणले गेल्याचा संशय आहे. पंजाबमधील तरूणांना वाममार्गाला लावण्यासाठी आणि पैसा कमावण्यासाठी ती तस्करी केली जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.