-->

गावठी कट्टा बाळगणारा जेरबंद

नगर (प्रतिनिधी) – कंबरेला गावठी कट्टा लावून फिरणार्‍या तरूणाला तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. संदीप महादेव रायकर (वय 29 रा. हंगेवाडी ता. श्रीगोंदा) असे अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे. त्याच्याकडून 20 हजार रूपये किंमतीचा गावठी कट्टा पोलिसांनी जप्त केला आहे. मंगळवारी रात्री शहरातील रेसीडेन्शीअल शाळेच्या बाहेर पोलिसांनी ही कारवाई केली.

पोलीस शिपाई दत्तात्रय कोतकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रायकर विरोधात आर्म अ‍ॅक्ट कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. रायकर कंबरेला गावठी कट्टा लावून फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांना मिळाली होती.

निरीक्षक गायकवाड यांनी गुन्हे प्रगटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे यांच्या पथकातील कर्मचारी शिरीष तरटे, अतुल कोतकर यांच्या पथकाला कारवाई करण्याच्या सुचना दिल्या.

पथकाने मंगळवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास रायकर याला गावठी कट्ट्यासह अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके करीत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.