कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी करणारे जेरबंद : सव्वाचार लाखांचा ऐवज हस्तगत

पुणे : कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी आणि घरफोडी करणाऱ्यांना सराईतांना हडपसर पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्या ताब्यातून 15 मोबाईल, पाच दुचाकी, दोन कोयते व रोख रक्कम असा 4 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

अभिजित अशोक रणदिवे उर्फ दाद्या (20,रा.सुरक्षानगर, हडपसर) व विशाल संजय लोखंडे (19,रा.रामटेकडी, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

हडपसर पोलिस ठाण्याच्या तपास पथकातील सहायक पोलिस निरीक्षक चव्हाण, पोलिस नाईक नितीन मुंढे, पोलिस शिवापई शशिकांत नाळे, प्रशांत टोणपे हे जबरी चोरी, घरफोडी आदी गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी गस्तीवर होते. यावेळी त्यांना ससाणेनगर कॅनोलवर दुध विक्रेत्याला कोयत्याचा धाक दाखवून त्यास लूटणारे दोघे पुरोहित स्वीट चौकात आले असल्याची खबर मिळाली. त्यानूसार संबंधीत ठिकाणी नाका बंदी करुन सांयीत दुचाकीवरुन आलेल्या दोघांना थांबण्याचा इशारा करण्यात आला. मात्र पोलिसांना पहाताच ते पळूण जाण्याचा प्रयत्न करु लागले. या प्रयत्नात ते दुचाकीवरुन खाली पडले. त्यांना क्षणाचाही विलंब न लावता जेरबंद करण्यात आले.

त्यांच्याकडे केलेल्या तपासात त्यांनी हडपसर येथील पोस्ट ऑफिस फोडण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. तसे घरफोडी, वाहनचोरी, रात्रीच्या वेळी वाहनचालकांना कोयत्याचा धाक दाखवून जबरदस्ती मोबार्सल काढून घेणे असे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईल व इतर दुचाकी वाहनांचा तपास सुरु आहे.

ही कारवाई अपर पोलिस आयुक्त सुनिल फुलारी, उपायुक्त सुहाब बावचे, सहायक आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश साठे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हमराज कुंभार, सहायक पोलिस निरीक्षक संजय चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक एम.टी.माने, सहायक फौजदार युसूफ पठाण, पोलिस कर्मचारी राजेश नवले, सौदोबा भोजराव, नितीन मुंढे, शशिकांत नाळे, प्रशांत टोणपे यांच्या पथकाने केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.