तरुणीसोबत अनैसर्गिक कृत्य करणारा अटकेत

पुणे – झारखंड येथून पुण्यातील आयटी कंपनीत नोकरीसाठी आलेल्या तरुणीसोबत अनैसर्गिक कृत्य करून तिला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरूणाला विमानतळ पोलिसांनी अटक केली.

प्रविण नद्यालकर (वय 29, रा. हरिओम सोसायटी, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत तरूणीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार 16 नोव्हेबर ते 9 डिसेंबर 2019 दरम्यान घडला. पिडीत मुलीचे आई-वडील झारखंड येथून पुण्यात आल्यानंतर घडलेल्या प्रकाराबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिडीत मुलगी झारखंड येथून नोकरी निमित्ताने पुण्यात आली होती. तर, प्रवीण हा ऑनलाइन नामांकीत कंपनीत डाटा इंट्रीचे काम करतो. पिडीत मुलगी पुण्यात आल्यानंतर तिची प्रवीण बरोबर मे 2009 मध्ये ओळख झाली होती. त्यानंतर फिर्यादी व प्रवीण यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. 16 नोव्हेंबर 2019 रोजी साडेसात वाजण्याच्या सुमारास तिच्या घरी जाऊन तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. तिने त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केल्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी देवून तो निघून गेला. त्यानंतर 9 जानेवारी 2019 रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास प्रवीण पुन्हा पिडीतेच्या घरी गेला. मला तुझी माफी मागायची आहे, मी तुझ्याशी लग्न करतो, असे सांगून पुन्हा तिच्यावर बलात्कार केला.

पोलिसात जाऊन तक्रार देते म्हणाल्यानंतर पुन्हा त्याने तिच्यावर अनैसर्गिक कृत्य केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी सांगितले. याप्रकरणी प्रविण याला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक मुजावर करत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.