कोल्हापूर(प्रतिनिधी) :- तहसीलदारांचे बनावट सही, शिक्के बनवून बिगरशेतीची बनावट कागदपत्रे व खोटे ‘एनए’चे आदेश काढणाऱ्या गजानन रवींद्र पाटील (वय -33, रा. शिवाजी गल्ली, कणेरी, ता. करवीर) या भामट्याला आज गोकुळ शिरगाव पोलीसांनी अटक केली. त्याच्याकडून संगणक, प्रिंटर सहित बनावट शिक्केही हस्तगत करण्यात आले आहेत.