पिंपरी – कर्तव्यावर असलेल्या पोलिसाला दमदाटी, शिवीगाळ आणि धक्काबुक्की करणाऱ्यास पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि. 11) रात्री इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडली.
शैलेश कृष्णा पाटील (वय 36, रा. दिघीरोड, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीस नाईक विलास भगवान माने यांनी रविवारी (दि. 11) याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी माने आणि त्यांचे सहकारी चोपडे हे कर्तव्यावर होते. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपीने आरडा ओरडा करीत तुम्ही सोहेल शेख यांची पावती का करता, तुम्ही बनावट पावती पुस्तक छापून पैसे कमविण्याचा धंदा करीत आहात. तुम्ही कारवाई करून दाखवाच, असे म्हणत पोलिसांना दमदाटी, शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली.