मुंबई – चित्रपट निर्मात्या एकता कपूर आणि शोभा कपूर यांच्यावर बेगुसराय न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. गतवर्षी माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शंभूकुमार यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. दरम्यान, ‘ट्रिपल एक्स’ या वेबसिरीजमध्ये सैनिकांचा अवमान झाल्याची घटना समोर आली.
एकता कपूरची वेब सीरिज ‘XXX’ सीझन 2 बऱ्याच दिवसांपासून वादात आहे. या वेब सीरिजमुळे गेल्या वर्षी बिहारच्या बेगुसराय कोर्टाने एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांना समन्स पाठवले होते.
दरम्यान, यावेब सीरिजमध्ये अनेक आक्षेपार्ह दृश्ये दाखवण्यात आली होती. त्यातल्या एका सीनमध्ये सैनिकाच्या पत्नीशी संबंधित आक्षेपार्ह सीनही होता. यासाठी बिहारच्या बेगुसरायमध्ये एकता कपूरवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बेगुसराय न्यायालयाने एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांना समन्स बजावून त्यांची उपस्थिती नोंदवण्याचे आदेश दिले होते.एकता कपूरवर तिच्या वेब सीरिजमध्ये भारतीय लष्कराचे जवान आणि त्यांच्या पत्नीचे आक्षेपार्ह दृश्ये दाखवल्याचा आरोप आहे. आणि त्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
बरौनी पोलीस ठाण्यातील सिमरिया आदर्श गावातील रहिवासी शंभू कुमार यांनी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाची सुनावणी बिहारच्या बेगुसराय येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी राजीव कुमार यांनी केली असून त्यांनी एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते.