नवी दिल्ली – जेईई आणि नीट या प्रवेश परीक्षांना विरोध करण्यासाठी दिल्लीत निदर्शने आयोजित करणाऱ्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांची आज पोलिसांनी धरपकड केली.
हे कार्यकर्ते आणि त्यांचे नेते अनिलकुमार हे निदर्शनांसाठी शास्त्री भवनाजवळ जमले असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले आणि नंतर त्यांना मंदिर मार्ग पोलिस ठाण्यात नेण्यात आले.
करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा घेणे धोकादायक असतानाही केंद्र सरकार या परीक्षा घेण्याचा हटवादीपणा करीत आहे त्यामुळे 25 लाख विद्यार्थ्यांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे असा आरोप अनिलकुमार यांनी केला.
अनेक राज्यांचाही या परीक्षा घेण्यास विरोध आहे. पण त्याकडे केंद्र सरकारने साफ दुर्लक्ष केले आहे. या परीक्षा तात्पुत्या पुढे ढकला, अशी आमची साधी मागणी आहे.अनेक विद्यार्थी आणि पालकांचीही हीच मागणी आहे पण सरकारला त्यांचा विरोध डावलून या परीक्षा घ्यायच्या आहेत असे ते म्हणाले.