पुणे,दि.12 – खराडी येथे दरोड्याच्या तयारीत असलेल्या अट्टल गुन्हेगारी टोळीतील चौघांना गुन्हे शाखेच्या युनिट 4 ने अटक केली आहे. लखन सुभाष जाधव, जयेश परशुराम गायकवाड, करण हरिदास जाधव, अजय अनिल जाधव (सर्व रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. चौघही पुणे शहर, पिंपरी-चिचवड पोलिस आयुक्तालय, रेल्वे पोलिस ठाण्यातील गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार आहे.
लखन जाधव विरूध्द जबरी चोरी, घरफोडी असे 21 पेक्षा जास्त गुन्हे, जयेश गायकवाड याच्यावर चोरी व जबरीचोरीचे तीन, करण जाधववर जबरी चोरी आणि लैंगिक अत्याचाराचा तर अजय जाधव याच्यावर चोरीचे तीन गुन्हे दाखल आहेत. आरोपी यांच्या विरूध्द पीएमपीमधील चोऱ्या तसचे इतर स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असून ते सक्रीय गुन्हेगार आहेत.
रविवारी पोलिस अंमलदार सुरेंद्र साबळे यांना चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत खराडीकडे जाणाऱ्या बायपासकडे पीएमपी बसस्टॉप समोर गृरूकृपा सिमेंट एजन्सी दुकानाजवळ चार ते पाच जण प्राणघातक हत्यारासह स्थाले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक रजनिश निर्मल यांनी पथक तयार करून रविवारी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास चौघांना जेरबंद केले.
त्यांच्याकडून दोन कोयते, एक चाकु, पाच मोबाईल, मिरची पावडर, नायलॉनदोरी असा 22 हजार रूपयाचा माल हस्तगत करण्यात आला आहे. त्यांच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीत त्यांचा पळुन गेलेला साथीदार सनी याच्यासह लकी देबी बार ऍण्ड बिर शॉपी या दुकानावर दरोडा टाकुन लुटणार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांच्यावर चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चन सिंह, हसाय पोलिस आयुक्त लक्ष्मण बोराटे, निरीक्षक रजनिश निर्मल याच्या मार्गदशानाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदिप जमदाडे, पोलिस उपनिरीक्षक शशिकांत शिंदे, उपनिरीक्षक दिपक माने,पोलीस अंमलदार गणेश साळुंके, दिपक भुजबळ, राजस शेख, सुरेंद्र साबळे, राकेश खुनवे, स्वप्निल कांबळे, नागेश कुवर, विशाल शिर्के, अशोक शेलार, रमेश राठोड, सागर वाघमारे यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी कारवाई केली