दिल्ली – देशाच्या राजधानीत करोनाचा पसार मोठ्या प्रमाणात झाला आहे. दरम्यान करोनाने आता दिल्ली पोलीसांनाही मोठ्या प्रमाणात घेरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिल्ली पोलिसातील सुमारे 1 हजार कर्मचारी करोनाच्या तिसऱ्या लाटेत संक्रमित झाले आहे. पोलिस दलात वाढत असलेल्या करोनामुळे दिल्ली पोलिसांनी चिंता आता वाढली आहे.
Around 1000 Delhi Police personnel, including Public Relations Officer and Additional Commissioner Chinmoy Biswal have tested positive for COVID19. All infected personnel are under quarantine: Delhi Police
— ANI (@ANI) January 10, 2022
दिल्ली पोलिसांकडून मिळालेल्या अधिकृत माहितवरून करोना संक्रमित झालेल्या पोलिसांमंध्ये दिल्ली पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी (पीआरओ) आणि अतिरिक्त पोलिस आयुक्त चिन्मय बिस्वाल यांचाही समावेश आहे. करोना संक्रमित झालेल्या सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अशी माहिती दिल्ली पोलिसांकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, करोना काळात पोलिसांवर मोठी जबाबदारी असते. मात्र पोलिसांनाच करोनाने घेरले असल्यामुळे पोलिसदलासह सर्वांच्याच चिंतेत भर पडली आहे.