Aroh Welankar | मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनी यंदाच्या वर्षी नवे घर, कार खरेदी केले आहे. यात आता ‘बिग बॉस’ फेम अभिनेता आरोह वेलणकरचा देखील समावेश झाला आहे. आरोहने एक आलिशान व्हिला खरेदी केला आहे.
आरोहने पुण्यात ‘Sage Villa’ या प्रोजेक्टमध्ये एक व्हिला बूक केला आहे. याचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. “नवीन हँगआउट स्पॉटला ‘हॅलो’ म्हणा…” असं कॅप्शन देत अभिनेत्याने या नवीन व्हिलाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या नवीन व्हिलाला त्याने काहीसा मॉर्डन टच दिला आहे. सध्या त्याच्या या पोस्टवर चाहत्यांसह कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. Aroh Welankar |
View this post on Instagram
आरोहच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रेगे’ चित्रपटातून आरोहने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. याशिवाय तो ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. ‘लाडची मी लेक गं’ या मालिकेत त्याने काम केलं आहे. अलीकडेच आरोहने बॉलीवूडमध्ये पदार्पण करत कार्तिक आर्यनच्या ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटात भूमिका साकारली होती.
हेही वाचा: