मुंबई – राम गोपाल वर्मा हे कधी आपल्या वक्तव्य किंवा चित्रपटांमुळे चर्चेत येत असतात. त्यांनी ‘सत्या’, ‘कंपनी’, ‘सरकार’, ‘रंगीला’, ‘अटॅक ऑफ २६/११’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली आहे.
My film on him is titled
“ARNAB”
THE NEWS PROSTITUTE
After extensively studying him I mulled on whether the tagline should be The News Pimp or The News Prostitute though both are relevant I finally settled on prostitute for its sound.— Ram Gopal Varma (@RGVzoomin) August 3, 2020
यातच राम गोपाल वर्मा नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे नाव ‘अर्णब- द न्यूज प्रॉस्टिट्यूट’ असं ठेवलं आहे. त्यांनी ही माहिती ट्विट करून दिली आहे. हा चित्रपट पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या पत्रकारीकेवर आधारित असेल असं म्हटलं जात आहे.
तत्पूर्वी, दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी ट्विट करत अर्णब गोस्वामीवर निशाणा साधला होता. त्यांनी सुशांत आत्महत्याप्रकरणी वरिष्ठ पत्रकार अर्णब गोस्वामीला खलनायक म्हणत ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राम गोपाल वर्मा ‘अर्णब- द न्यूज प्रॉस्टिट्यूट’ चित्रपटामुळे चर्चेत आले आहे.