सेना तालुकाप्रमुखाचा विजेच्या धक्‍क्‍याने मृत्यू

फलटण – हनुमंतवाडी, ता. फलटण येथील शिवसेनेचे तालुका प्रमुख राहुल देशमुख यांचा आज सकाळी घरी इलेक्‍ट्रिक हिटरमधून पाणी काढतताना विजेचा धक्का बसल्यामुळे मृत्यू झाला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, राहुल सदाशिव देशमुख (वय 31) रा. हनुमंतवाडी ता. फलटण हे आज सकाळी आंघोळीसाठी इलक्‍ट्रिक हिटरमधून पाणी काढत असताना त्यांना विजेचा तीव्र धक्का बसला.

विजेच्या धक्‍क्‍यामुळे ते गंभीर जखमी झाले. कुटुंबीयांच्या निदर्शनास ही घटना आल्यानंतर त्यांनी तत्काळ राहुल देशमुख यांना बारामतीमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेमुळे फलटण तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राहुल देशमुख शिवसेनेमध्ये सक्रिय होते. शिवसेनेचा विविध पदावर त्यांनी काम केले आहे. शिवसेनेच्या माध्यमातून सामान्यांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले होते. राहूल देशमुख यांच्या निधनामुळे ग्रामीण भागात उत्कृष्ट काम करणारा शिवसैनिक हरपला आहे. ग्रामीण भागात शिवसेच्या शाखा निर्माण करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते.

शिवसेनेचा आक्रमक आणि ग्रामीण बाज असलेला चेहरा होता. त्यांनी फलटण तालुका प्रमुख म्हणून खूप वर्ष काम केले. शिवसेनेच्या तालुका प्रमुख पदाची यशस्वी धुरा सांभाळली होती. सातारा जिल्ह्यात ग्रामीण भागात पक्षवाढीसाठी त्यांचे योगदान मोलाचे होते. मनमिळाऊ व प्रेमळ स्वभावामुळे त्यांचा मोठा मित्र परिवार होता. त्यांच्या या अपघाती निधनामुळे फलटण तालुक्‍यात हळहळ होत आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी दोन मुले आई वडील व भाऊ असा परिवार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.