“आर्मी ऑफ द डेड’ चे पोस्टर रिलीज

हुमा कुरेशी हॉलिवूडमधील “आर्मी ऑफ द डेड’ मध्ये लीड रोल करते आहे. तिने या सिनेमाचे पोस्टरही रिलीज केले आहे. जॅक स्नायडर दिग्दर्शक असलेल्या या सिनेमातून हुमा कुरेशी हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तिची व्यक्तिरेखा चक्क भारतीय आहे आणि सिनेमात तिचे नाव गीता असणार आहे.

“आर्मी ऑफ द डेड’च्या रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये हुमाच्या हातात लांबलचक चाकू दिसतो आहे. याचा अर्थ या सिनेमात तिचा रोल ऍक्‍शनवर आधारलेला आहे. हे पोस्टर रिलीज करताना हुमाने भारतात पसरलेल्या करोनाच्या आपत्तीबाबत भारतीयांप्रती सहवेदना व्यक्‍त केली आहे. आपल्या व्यवसायिक कटिबद्धतेचा भाग म्हणून आपण या सिनेमाचे सगळे काम पूर्ण केले आहे. पण आप्ल्याला या सिनेमापेक्षा भारतीयांची चिंता अधिक असल्याचे तिने म्हटले आहे.

“आर्मी ऑफ द डेड’चे शुटिंग 2019 मध्येच झाले होते. पण गेल्या वर्षी करोनाच्या साथीमुळे हा सिनेमा रिलीज होऊ शकला नव्हता. त्यामुळे यावर्षी निवडक थिएटरमध्ये 14 मे रोजी आणि 21 मे रोजी नेटफ्लिक्‍सवर हा सिनेमा रिलीज होणार आहे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.