घोरपडी लोहमार्गालगत आढळला जवानाचा मृतदेह

मृत्यूचे कारण अस्पष्ट : दुर्गंधी आल्याने समोर आली माहिती

पुणे – घोरपडीतील लोहमार्गालगत एका लष्करी जवानाचा मृतदेह रविवारी दुपारी आढळून आला. जवानाने आत्महत्या केली असल्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली आहे. लष्करी जवानाचा मृतदेह असल्याने पोलिसांनी याची माहिती लष्कराला दिली होती. यामुळे मोठ्या प्रमाणात लष्करी जवान घटनास्थळी दाखल झाले होते. यामुळे परिसरात खळबळ उडाली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

घोरपडी लोहमार्गालगत रविवारी सकाळपासून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत होती. रेल्वेचे कर्मचारी व स्थानिक नागरिकांनी पाहणी केल्यानंतर तेथे कुजलेल्या अवस्थतील एक मृतदेह आढळून आला. याबाबत पोलिसांना ही माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यावेळी तेथे एका लष्करी जवानाचा मृतदेह असल्याचे आढळून आले. याप्रकरणाची तातडीने लष्करला माहिती देण्यात आली. त्यानंतर तेथे लष्करी जवान मोठ्या संख्येने दाखल झाले. त्यांनी बघ्यांना घटनास्थळापासून दूर ठेवले. दरम्यान, लष्करी जवान मोठ्या संख्येने लोहमार्गावर आल्यामुळे नागरिकांमध्ये वेगवेगळ्या स्वरुपाची चर्चा सुरू होती. मृत जवानाची ओळख पटू शकली नाही. मात्र, त्याने आत्महत्या केल्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली आहे.

मुंढवा पोलिसांत “मिसिंग’ची तक्रार

संबंधित जवानाचे नाव रमेश असल्याचे समजते. त्याच्या घरच्यांनी दोन दिवसांपूर्वीच तो “मिसिंग’ झाल्याची तक्रार मुंढवा पोलीस ठाण्यात नोंदवली होती. त्याने घर सोडून जाताना एक सुसाईड नोट लिहली होती. यामध्ये “आत्महत्येस कोणासही जबाबदार धरू नये,’ असे म्हटले होते. मृत्यूनंतर मिळणारे पैसे एका बहिणीला 40 टक्के तर उर्वरीत दोन भाऊ व एका बहिणीने प्रत्येकी 20 टक्के घ्यावे, असेही सुसाईड नोटसमध्ये लिहले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)