लष्कर प्रमुखांची लेहला भेट देऊन जवानांशी संवाद

लेह – भारत आणि चीन यांच्यातील पूर्व लडाखमधील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर लष्करप्रमुख एम. एम नरवणे यांनी लेहच्या सीमावर्ती भागात तैनात केलेल्या 14 कॉर्पस्‌ चे जवान आणि कमांडर यांची भेट घेऊन त्यांचे मनोधैर्य उंचावले. हे दल फायर अँड फ्युरी कॉर्पस्‌ म्हणूनही ओळखले जाते.

सध्या गोठवणाऱ्या थंडीचा सामना करणाऱ्या लेहला लष्करप्रमुखांनी भल्या सकाळी भेट दिली. त्यांच्या दिवसभराच्या दौऱ्यात तेथील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी रचिन ला येथे जाऊन प्रत्यक्ष ताबा रेषे नजिकच्या तयारीचा स्वत: आढावा घेतला.

या भागातील दलाच्या सज्जतेची माहिती लेफ्टनंट जनरल पीजीके मेनन यांनी दिली. प्रत्यक्ष ताबा रेषेवर तैनात केलेल्या सैन्याची प्रत्यक्ष जागेवर जाऊन त्यांची चौकशी केली. त्यांच्या सज्जतेबद्दल त्यांचे कौतूक केले.

तेथून त्यांनी तारा येथील तळाला भेट दिली. तेथे जवनांशी त्यांनी संवाद साधला. लष्करप्रमुखांनी लेहला यापुर्वी जुनमध्ये आणि सप्टेंबरमध्ये भेट दिली. त्यावेळी पंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यां समवेत ते आले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.