सियाचिन मधील स्थितीबाबत लष्कर प्रमुखांची संरक्षण मंत्र्यांशी चर्चा

नवी दिल्ली: सियाचिन प्रदेशातील सध्याच्या नेमक्‍या स्थितीबाबत लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी आज संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्याशी चर्चा करून तेथील स्थितीची माहिती दिली. तेथे अलिकडेच झालेल्या बर्फकडे कोसळण्याच्या घटनांमुळे लष्कराचे चार कर्मचारी आणि दोन हमाल ठार झाले आहेत.

या घटनेत केवळ दोन लष्करी अधिकारी वाचू शकले आहेत. त्या घटनेच्या संबंधात माहिती घेण्यासाठी संरक्षण मंत्र्यांनी लष्कर प्रमुखांना चर्चेसाठी पाचारण केले होते. या प्रकाराबद्दल संरक्षण मंत्र्यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले. अत्यंत विपरीत परिस्थितीला तोंड देत आपले जवान आणि आधिकारी तसेच अन्य कर्मचारी आपली सेवा बजावत आहेत त्याबद्दल संरक्षण मंत्र्यांनी त्यांना सलाम केला.कारकोरम रेंज मध्ये सियाचीनचा बर्फाळ प्रदेश हा 20 हजार फूट उंचीवर असून तेथे सध्या कमालीचा गारठा आणि हिमवर्षाव होत आहे. तेथील सध्याचे तापमान उणे 60 अंश सेल्सीयस इतके आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.