महापौर विजय औताडे यांचा राजीनामा
औरंगाबाद – महानगरपालिकेची आज सर्वसाधारण सभा होती. या सभेत शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. या ठरावाला भाजपने जोरदार आक्षेप घेतला.
यावेळी भाजपचे महापौर विजय औताडे सभागृहातील मंचावर न बसता नगरसेवकांमध्ये जाऊन बसले. उपमहापौरना आपण स्टेजवर का बसत नाही, असे विचारले असता. मला तिथे बसण्याचा अधिकार नाही असं त्यांनी स्पष्ट केले.
भाजपचा मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदन ठरावाला विरोध असून, शिवसेने आमच्या सोबत दगा केला. महापौर नंदकुमार घोडेले यांना देखील येथे बसण्याचा अधिकार नाही.असे म्हणताच शिवसेना भाजप नगरसेवक समोरासमोर आले. या वादामुळे औरंगाबाद महापालिकेत युतीत दुही निर्माण झाली.