बेरूत – इस्त्रायलकडून लेबनॉनमध्ये हिज्बुल्लाहच्या ठिकाणांवर सातत्याने हल्ले सुरू असतानाच हिजबुल्लाहचे नवीन प्रमुख नइम कासिम यांनी बुधवारी सांगितले की, आम्ही काही अटींवर युद्धविराम करण्यास सहमत होऊ शकतो. लेबनॉनचे पंतप्रधान नजीब मिकाती म्हणाले की ते येत्या काही तासांत किंवा दिवसांत युद्धविराम करण्याबाबत ते आशावादी आहेत.
ब्रॉडकास्टर अल-जादीदशी बोलताना मिकाती म्हणाले की, अमेरिकेचे दूत अमोस हॉचस्टीन यांनी सुचवले आहे की आम्ही येत्या काही दिवसांत म्हणजे अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या अगोदर अर्थात 5 नोव्हेंबरपूर्वी युध्दविरामाचे उदिष्ट गाठले जाऊ शकते असे अंदाज वर्तवले जात आहेत.
गेल्या महिन्यात इस्रायलने केलेल्या मोठ्या हवाई हल्ल्यात त्याचा हिज्बुल्लाहचा तत्कालीन प्रमुख हसन नसराल्लाह मारला गेल्यानंतर कासिम मंगळवारी इराणचे समर्थन असलेल्या या चळवळीचा नेता बनला. पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या पहिल्या भाषणात तो म्हणाला की, हिजबुल्लाह अनेक महिने लेबनॉनमध्ये इस्रायली हवाई आणि जमिनीवरील हल्ल्यांचा प्रतिकार करू शकेल. मात्र जर इस्त्रायलींनी ठरवले की त्यांना आक्रमण थांबवायचे असेल तर आम्ही म्हणू की आम्हीही हे मान्य करतो, परंतु आम्हाला योग्य आणि योग्य वाटेल अशा परिस्थितीत ही बाब स्वीकारली जाईल. मात्र, हिजबुल्लाला अद्याप कोणताही विश्वासार्ह प्रस्ताव आलेला नाही.
इस्रायलचाही युद्धबंदीचा विचार –
इस्रायलचे ऊर्जा मंत्री एली कोहेन यांनी सांगितले की, युद्धविराम करण्यासाठी ते कोणत्या अटी देऊ शकतात यावर चर्चा करण्यासाठी देशाच्या सुरक्षा मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. माजी गुप्तचर मंत्री कोहेन यांनी इस्रायलच्या सार्वजनिक रेडिओला सांगितले की, चर्चा चालू आहे, मला वाटतं अजून वेळ लागेल. इस्रायलच्या चॅनल 12 नुसार, पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी 60 दिवसांच्या युद्धबंदीच्या बदल्यात मंत्र्यांशी चर्चा केली.
जोरदार कारवाई करा –
युद्धविराम लागू करण्यासाठी आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप यंत्रणा स्थापन केली जाईल, परंतु इस्त्राईल धमकीच्या बाबतीत कारवाईचे स्वातंत्र्य राखेल याची हमी घेइल. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी सांगितले की, गाझा आणि लेबनॉनमधील दोन्ही युद्ध संपवण्यासाठी करार करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे मध्यपूर्व सल्लागार ब्रेट मॅकगुर्क आणि हॉचस्टीन इस्रायलला भेट देत आहेत. ते लेबनॉनमधील तसेच गाझामधील संघर्ष कसा संपवायचा यावर चर्चा करण्यासाठी इस्रायलला जात आहेत. इकडे लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की बालबेकमधील दोन भागांवर इस्रायली हल्ल्यात किमान 19 लोक मारले गेले.