मुंबईत भरदिवसा बॅंकेवर सशस्त्र दरोडा

तब्बल पावणे दोन कोटींचे सोने लुटले

मुंबई – नालासोपारा पूर्वेकडील युनायटेड पेट्रो फायनान्स लिमिटेडच्या आयटीआय गोल्ड लोनच्या कार्यालयावर आज भरदिवसा सशस्त्र दरोडा पडल्याची घटना घडली. यात सकाळी साडेदहाच्या सुमारास चारचाकी वाहनातून सहा दरोडेखोर हत्यारांसह आले. या दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांना धमकावित सुमारे एक कोटी 75 लाख किंमतीचे सोने लुटून नेले आहे. या दरोड्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत.

नालासोपारा पूर्वेकडील तुळींज पोलीस स्टेशनपासून 300 मीटर अंतरावर सेन्ट्रल पार्क या मुख्य रस्त्यावर युनायटेड पेट्रो फायनान्स कंपनीचे गोल्ड लोनचे कार्यालय आहे. या ठिकाणी सोने गहाण ठेवून त्यावर कर्ज दिले जाते. तसेच येथे लॉकर सुविधाही उपलब्ध आहे.

दरम्यान, आज सकाळी साडेदहाच्या सुमारास 6 सशस्त्र दरोडेखोर लाल रंगाच्या तवेरा गाडीतून आले. दरोडेखोरांनी तोंडाला रुमाल बांधला होता, मंकी कॅपही घातली होती. या दरोडेखोरांनी कार्यालयात घुसून पहिल्यांदा कार्यालयातील कर्माच्याऱ्यावर तलवार, चाकू आणि पिस्तूल रोखले. कर्मचाऱ्यांचे हातपाय बांधून ठेवले आणि त्यानंतर कार्यालयातील 234 लॉकर्समधील सोने दोन थैल्यांमधून भरुन पोबारा केला. यात एक कोटी 75 लाख 41 हजार रुपये किंमतीचे 4.659 किलो वजनाचे सोने घेऊन अवघ्या 15 मिनिटात हे दरोडेखोर फरार झाले.

ज्या गाडीतून दरोडेखोर आले होते ती गाडी विरार पूर्वेकडील मोहक सिटी परिसरात सोडून, तेथून बाईकने हे दरोडेखोर पसरा झाले. पोलिसांनी गाडी आणि सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन दरोडेखोरांचा तपास सुरू केला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×