आपल्यापेक्षा वयानं मोठी आणि विवाहित असणाऱ्या मलायिका अरोरासोबतच्या कथित अफेअरमुळे चर्चेत असलेला अर्जुन कपूर “पानिपत’ चित्रपट साफ आपटल्यामुळे चांगलाच निराश झाला आहे.
आशुतोष गोवारीकरच्या या बिग बजेट चित्रपटाकडून अर्जुनला खूप अपेक्षा होत्या. पण तिकीट खिडकीवर तो सपशेल आपटल्यामुळे अर्जुन सापशिडीतल्या खेळाप्रमाणे शून्यावरच आला आहे. सध्या त्याचा एकही चित्रपट फ्लोअरवर नाहीये.
परिणती चोप्रासोबता “संदीप आणि पिंकी फरार’ हा महत्त्वपूर्ण चित्रपट बऱ्याच दिवसांपूर्वीच तयार झाला आहे. पण प्रदर्शनाचे नावच घेत नाहीये. दिवाकर बॅनर्जींचा हा चित्रपट प्रदर्शित करण्यास यशराज बॅनरला काही अडचणी येत आहेत.
मोहित सुरीच्या “एक व्हिलन-2′ मध्ये त्याला चांगली भूमिका मिळाली आहे. काशीव नायरच्या एका चित्रपटातही त्याला महत्त्वाचा रोल मिळाला आहे. पण काही कारणांमुळे हे दोन्हीही चित्रपट प्रदर्शनासाठी पुढे सरकत नाहीत. त्यामुळे आजघडीला तरी अर्जुनच्या हातात काहीच नाहीये.
View this post on Instagram
Perfect intra workout power with Ripped BCAAs by @Nutraboxindia #nutrabox #nutraboxbcaas
अर्जुनला याबाबत विचारलं असता तो म्हणतो, “पानिपत’कडून मला खूप अपेक्षा होत्या. पण प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली आहे. या चित्रपटामुळे प्रेक्षकांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल, असे मला वाटले होते; पण प्रत्यक्षात झाले उलटेच! त्यामुळे माझा निशाणा चुकला आहे हेच खरे! अर्थात ही कबुली देतानाच “मी निराश झालेलो नाही. काहीसा अपसेट आहे. पण लवकरच मी यातून बाहेर येईन आणि धडाकेबाज “कमबॅक’ करेन, असा विश्वासही तो व्यक्त करतो.