मुंबई – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन आता मुंबई सोडून गोवा संघाकडून देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत खेळणार आहे. त्यासाठी त्याने मुंबई क्रिकेट संघटनेकडे ना हरकत प्रमाणपत्रही मागितले आहे.
अर्जुन डावखुरा वेगवान गोलंदाज असून यंदाच्या आयपीएल स्पर्धेत तो मुंबई इंडियन्स संघात होता. तसेच त्याने देशांतर्गत क्रिकेटमधील टी-20 स्पर्धा सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत दोन सामन्यात मुंबईचे प्रतिनिधित्व केले होते. अर्जुनच्या कारकिर्दिसाठी जास्तीजास्त सामने खेळणे गरजेचे आहे. त्यामुळेच त्याने अन्य राज्याकडून खेळ गरजेचे आहे, असे मत एसआरटी मॅनेजमेंटने व्यक्त केले आहे.
अर्जुनने 19 वर्षाखालील भारतीय संघाकडून श्रीलंकेविरूद्ध दोन कसोटी सामने देखील खेळले आहेत. त्यानंतर त्याने मुंबईच्या संघात स्थान मिळवले. मात्र त्याला एकही सामना न खेळवता संघातून वगळण्यात आले. त्यामुळे त्याला आपली गुणवत्ता दाखवून देण्याची पुरेशी संधी मिळाली नाही. अर्जुन सध्या मुंबई इंडियन्सच्या युवा संघासह इंग्लंडमध्ये स्थानिक टी-20 स्पर्धेत खेळत आहे.