मुंबई – कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. कोरोना व्हायरसचा फैलाव होऊ नये यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे आता सामान्य नागरिकच न्हवे तर अनेक बडे कलाकार सुद्धा आपल्या घरात बसून आहेत.
मात्र, अशा परिस्थिती अभिनेता ‘अर्जुन रामपाल’ त्याची प्रेयसी गैब्रिएला आणि सात महिन्यांच्या मुलासोबत कर्जतमध्ये अडकलेला आहे. अशी माहिती खुद्द अर्जुनने दिली आहे. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने या व्हिडिओद्वारे सांगितले आहे की, लॉकडाऊन घोषित व्हायच्याआधी मी एका चित्रपटाचे चित्रीकरण कर्जतमध्ये करत होतो. त्यामुळे आता मी चित्रीकरणाच्या ठिकाणीच अडकलो आहे.
व्हिडिओमध्ये अर्जुनची दाढी वाढलेली असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यावर अर्जुनने सांगितले आहे की, माझी ही अवस्था पाहून मी साधू बनलो आहे का असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल… पण आता कोरोना व्हायरसमुळे सगळ्यांवरच एखाद्या साधुसारखे जीवन जगण्याची वेळ आली आहे. त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या कुटुंबियांसोबत खूप चांगला वेळ घालवत असाल अशीच मी आशा करतो. असं तो म्हणाला.