अर्जुन रामपाल आणि मेहर जेसियाचा काडीमोड

बॉलिवुड अभिनेता अर्जुन रामपाल आणि मेहर जेसिया यांनी 21 वर्षांनंतर अधिकृतपणे घटस्फोट घेतला आहे. बांद्रा येथील एका कौटुंबिक न्यायालयात त्यांनी आपआपल्या सहमतीने काडीमोड घेत असल्याचे सांगितले आहे.

या दाम्पत्याने 30 एप्रिल 2019 रोजी न्यायालयात धाव घेत घटस्फोटासाठी अर्ज केला होता. त्यानंतर सहा महिन्यांनी स्पेशल मॅरेज ऍक्‍टअंतर्गत त्याला मंजुरी देण्यात आली. त्यांना दोन मुली असून त्या दोघीही आईसोबत बांद्रास्थित डुप्लेक्‍स येथे राहणार आहेत. दरम्यान, दोघेजण विभक्‍त होणार असल्याचे वृत्त 2011मध्ये समोर आले होते. परंतु याबाबत दोघांनी 2018मध्ये अधिकृतपणे जाहीर केले. यापूर्वीच अर्जुन एका 2 बीएचके घरात शिफ्ट झाला होता.

अर्जुनचे गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्‌स सुत जुळले असून दोघांना एक मुलगा देखील आहे. ज्याचे नाव अरिक असे असून त्याचा जन्म याच वर्षी 18 जुलैला झाला होता. याबाबत अर्जुन रामपालशी संपर्क साधण्याला असता तो म्हणाला, मी याबाबत तुम्हाला खुलासा का देवू आणि याचा कोणाशी काय संबंध आहे. मी याबाबत काहीही बालू इच्छित नाही, असे सांगत त्याने काढता पाय घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.