अर्जुय रामपाल आणि मेहरमध्ये फायनल सेटलमेंटला सुरुवात

अर्जुन रामपाल आणि मेहर जेसिया यांनी गेल्या वर्षी आपल्या 20 वर्षांच्या वैवाहिक आयुष्याचा शेवट करण्याचा निर्णय घोषित केला होता. मात्र त्यांनी आतापर्यंत घटस्फोटाची औपचारिकता पूर्ण केलेली नाही. अर्जुनने अलिकडेच आपली गर्लफ्रेंड ग्रॅब्रिएला डेमोट्रिएटसच्या प्रेग्नन्सीची गुडन्यूज सोशल मिडीयावरून जगजाहीर केली आहे. आता गॅब्रिएलाच्या बाळाच्या जन्मापूर्वीच अर्जुन आणि ग्रॅब्रिएलाला विवाह करायचा आहे. त्यासाठी अर्जुन आणि मेहरचा घटस्फोट व्हायला हवा. म्हणूनच या दोघांनी फायनल सेटलमेंटच्या प्रोसेसला सुरुवात केली आहे.

काही दिवसांपूर्वी एका बॅंकेबाहेर अर्जुन आणि मेहर एकत्र दिसले होते. दोघांची रस्ता ओलांडला तेंव्हाचे फोटोही व्हायरल झाले होते. मात्र त्यांनी एकमेकांपासून अंतर राखले होते. याचा अर्थ आर्थिक व्यवहार पूर्ण करण्याची दोघांना घाई झाली आहे. मेहर आणि दोन मुलींसाठीची आर्थिक तरतूद करण्याची जबाबदारी अर्जुनवर आली. ग्रॅब्रिएलाबरोबर लग्नासाठी आतुर झालेल्या अर्जुनला ही प्रोसेस जितक्‍या लवकर पूर्ण होईल, तेवढे हवेच आहे. घटस्फोटासाठी दोघांचीही पूर्वसंमती आहे आणि दोघेही दीर्घकाळापासून विभक्‍त रहात आहेत. त्यामुळे कोर्टकचेऱ्यांमध्ये आता वेळ जाणार नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.