अर्जुन रामपाल आणि गॅब्रिएलाला पुत्ररत्न

दोन मुलींचा पिता असलेला अर्जुन रामपाल आता एका गोंडस मुलाचाही पिता आहे. अर्जुनची पार्टनर गॅब्रिएल देमेत्रियादेसने गुरुवारी मुंबईतल्या एका हॉस्पिटलमध्ये एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. या आनंदी क्षणाबाबत अर्जुन स्वतःच्या भावना व्यक्‍त करूही शकला नाही, इतका त्याला आनंद झाला आहे.

या क्षणी कसे वाटते आहे, असे त्याला विचारल्यावर “खूप थकल्यासारखे’ असे तो म्हणाला. गॅब्रिएलाला रुग्णालयात दाखल केल्यापासून तो व्यवस्थित झोपू शकलेला नाही. पूर्वी मुलींचा जन्म झाला तेंव्हा आपल्याला जेवढा तणाव होता, तेवढाच याहीवेळी होता. मुलगा व्हावा, अशी आपली मनापासून ईच्छा होती. माझ्या कुटुंबामध्ये मुलाचे स्वागत करण्यासाठी मी उत्सुक आहे, असे तो म्हणाला.

माहिका आणि मायरा या अर्जुनच्या मुलीदेखील आपल्या धाकट्या भावाचे स्वागत करण्यासाठी उपस्थित होत्या. आता अपले कुटुंब परिपूर्ण झाल्यासारखे वाटू लागले आहे. आता आपल्याला अधिक काहीही नको, असेही अर्जुन म्हणाला. अर्जुन आणि त्याची मॉडेल पत्नी जेसिका जेसिका यांनी गेल्यावर्षी घटस्फोट घेतला. गॅब्रिएलाबरोबर अर्जुनचे अफेर सुरू झाल्यापासूनच या संसारामध्ये अडचणी यायला लागल्या होत्या.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)