बॉलीवूडमधील तारे-तारखा नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी मुंबईबाहेर जाण्याला प्राधान्य देतात. यातील अनेकांची पावले गोव्याकडे वळताना दिसतात. बी-टाऊनची हॉट ऍक्ट्रेस मलायका अरोराही यंदा थर्टी फर्स्टसाठी गोव्याला गेली होती. मलायकाने आपली बहीण अमृता आणि तिचा पती शकील यांच्यासह अन्य काही मित्रांबरोबर नववर्ष स्वागताचा जल्लोष अनुभवला.
View this post on Instagram
यादरम्यान गोव्यातील पार्टीची अनेक छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरस झाली आहेत. या फोटोंमध्ये मलायका-अमृता या भगिनी खूप दंगामस्ती करताना दिसत आहेत. मलायकानेही यातील काही फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये मलायका नेहमीप्रमाणेच हॉट आणि स्टायलिश दिसत आहे. पण हे फोटो किंवा मलायका त्यामुळे चर्चेत आलेले नाहीत.
View this post on Instagram
तर सध्या मलायकाने असाच एक रोमॅन्टिक फोटो शेअर केला आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. यावरून नेहमीप्रमाणे काहींनी मलायका व अर्जुनला ट्रोलही केलेय. पण या फोटोचे कौतुक करणारेही बरेच चाहते आहेत.