परिणितीच्या फोनमध्ये अर्जुन कपूरचा फोटो

परिणिती चोप्रा कधीही हातचे राखून कोणतेही मतप्रदर्शन करत नाही. तिच्या मनात जे काही असते, ते ती अगदी खुल्लमखुल्ला बोलून रिकामी होते. “आत एक, बाहेर एक’ असली भानगड नाही. तिला जेंव्हा तिच्या लव्ह लाईफबाबत विचारले गेले, तेंव्हा तिने ते सीक्रेटही सांगून टाकले. अर्जुन कपूरबाबत आपल्या मनात काही खास फिलींग्ज आहेत.

दोघे जण चांगले मित्र आहोतच पण तेवढेच दोघांमध्ये द्वेषाचेही नाते असल्याचे तिने सांगितले. तिचे हे म्हणणे अगदीच गूढ होते. पण बॉलिवूडमध्ये खरे दोस्त मिळणे अवघडच आहे, हे तिच्या बोलण्यातून स्पष्ट झाले. पण अर्जुन कपूरच्या रुपाने तिला एक चांगला मित्र मिळाला, एवढे तरी तिच्या बोलण्यातून स्पष्ट झाले. अर्जुनबरोबर मोकळेपणाने बोलायला तिला आवडते.

आपला फोन अर्जुनच्या हातात द्यायला तिला भीती वाटत नाही. तिच्या फोनमध्ये अर्जुन कपूरचे 50 पेक्षा जास्त सेल्फी असल्याचेही तिला सांगायला कोणताही संकोच वाटत नाही. परिणितीने अर्जुन कपूरबरोबर “इश्‍कजादे’ आणि “नमस्ते इंग्लंड’मध्ये काम केले आहे. सध्या यादोघांचे बॉन्डिंग एकदम भारी आहे. आता “संदीप और पिंकी फरार’मध्येही दोघे एकत्र असणार आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.