“पानीपत’च्या शूटिंग दरम्यान अर्जुन कपूर जखमी

डायरेक्‍टर आशुतोष गोवारिकर यांच्या आगामी “पानीपत’च्य सेटवर शूटिंगदरम्यान अभिनेता अर्जुन कपूर जखमी झाला आहे. अर्जुन कपूरने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत आपल्या डोक्‍याला झालेली दुखापतीची माहिती दिली. या फोटोला त्योन “आउच’ अशी फोटो कॅप्शनही दिली आहे.

या चित्रपटातील आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी अर्जुन कपूर खूपच मेहनत घेत आहे. यासाठी तो कोणत्याही आव्हानांला सामोरे जाण्यास तयार आहे. या चित्रपटात तो घोडेस्वारी करतानाही दिसणार आहे. या चित्रपटातील त्याच्या परिश्रम आणि घेत असलेल्या मेहनतीवरून अर्जुन कपूर आपल्या चाहत्यांची मने नक्‍कीच जिंकणार असल्याचे दिसते.

दरम्यान, अर्जुन कपूरला टक्‍कल पडले असल्याची चर्चा होत आहे. कारण प्रत्येक वेळी तो टोपीच दिसत असतो. विशेष म्हणजे जिमिंग सेशनच्या व्हिडिओमध्येही त्याने स्वतःचे डोके झाकून घेतल्याचे दिसते. पण अर्जुन कपूरने शेअर केलेल्या फोटोत त्याच्या हेयरस्टाईलची झलक दिसत आहे. “पानीपत’मध्ये अर्जुन कपूरशिवाय संजय दत्त, पद्मिनी कोल्हापुरे आदी कलाकार मुख्य भूमिका साकारत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.