अर्जुन कपूरने आपल्या “कुत्ते’ या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. आसमान भारद्वाजच्या डायरेक्शनमध्ये तयार होणारा हा पहिलाच सिनेमा आहे.
या सिनेमाची पहिली झलक अर्जुन कपूरने सोशल मीडियावर दाखवली आहे. कुत्र्यांचे मुखवटे घातलेल्या 7 व्यक्ती ओळीने उभ्या असलेले या फर्स्ट लूकमध्ये दिसते आहे.
“ना ये भोंकते है और नाही ये गुर्राते है, बस कांटते है’ असे अर्जुन कपूरने आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. या सिनेमात अर्जुन कपूरच्या बरोबर कोंकणा सेन शर्मा,
नसिरुद्दीन शाह, कुमुद मिश्रा, राधिका मदान, शार्दुल भारद्वाज आणि तब्बू हे लीड रोलमध्ये दिसणार आहेत. सध्या या सिनेमाचे प्री-प्रॉडक्शन सुरू आहे.
यावर्षाच्या अखेरीस या सिनेमाचे शूटिंग सुरू होणार आहे. विशाल भारद्वाज आणि लव्ह रंजन हे दाघेही मिळून हा सिनेमा बनवत आहेत. आसमान भारद्वाज या सिनेमाचे डायरेक्शन करणार आहे.
त्याने वडील विशाल भारद्वाज यांना ” 7 खून माफ,’,”मटरू की बिजली का मंडोला’ आणि “पटाखा’ या सिनेमांसाठी सहायक म्हणून काम केले आहे. सिनेमाच्या पहिल्या झलकवरून तरी हा सिनेमा एक कॉमेडी असणार आहे, असा अंदाज व्यक्त करता येऊ शकतो.