बॉलीवूडमधील खिलाडी अर्थात अक्षय कुमारच्या “हाउसफुल-4’मधील “शैतान का साला’ हे गाणे प्रदर्शित झाल्यापासून “बाला चॅलेंज’ने सर्वांना आपल्या कवेत घेतले आहे. अक्षय कुमार सोशल मीडियावर या गाण्याचे सिग्नेचर स्टेप्स परफॉर्म करत मजेदार व्हिडिओ पोस्ट करत आहे. या लिस्टमध्ये चित्रपटसृष्टीतील कलाकारांचेही नाव आहेत. करीना कपूरपासून ते रणवीर सिंह, दिलजीत दोसांझ आणि कियारा आडवाणीपर्यंत सर्वांनी “बाला चॅलेंज’ पूर्ण केले आहे.
आता या ग्रुपमध्ये अर्जुन कपूर आणि मनीष पॉल यांच्या नावाचाही समावेश झाला आहे. अर्जुनने नुकतेच मनीषसोबत त्यांच्या नवीन शो “मूवी मस्ती विद मनीष पॉल’चे शूट केले आहे. या शूट दरम्यान अर्जुन आणि मनीष यांनी “शैतान का साला’ गाण्याचे हुक स्टेप्स परफॉर्म केले. याचा व्हिडिओ अर्जुनने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
दरम्यान, “हाउसफुल-4′ चित्रपट दिवाळीप्रसंगी प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत कृति सेनन, कृति खरबंदा, बॉबी देओल, रितेश देशमुख, चंकी पांडे आणि अन्य कलाकारांची मोठी फौज आहे.