#AsianWrestlingChampionships : अर्जुनला ब्राँझपदक

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिली स्पर्धा खेळणा-या भारताच्या अर्जुन हाराकुर्कीने आशियाई कुस्ती अंजिक्यपद कुस्ती स्पर्धेत ग्रीको-रोमनमधील ५५ किलो वजनी गटात ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले.

अर्जुनने ब्राँझपदकाच्या लढतीत कोरियाच्या डाँगओकाचा ७-४ असा पराभव करत विजय संपादित केला. तर, दुसरीकडे भारताच्या मेहरसिंगचे १३० किलो वजनी गटात ब्राँझपदक थोडक्यात हुकले. ब्राँझपदकाच्या लढतीत त्याला किर्गिस्तानच्या रोमन किमकडून २-३ असा पराभव पत्करावा लागला.

दरम्यान, उपांत्य फेरीच्या लढतीत अर्जुनला इराणचा मल्ल मोहम्मद नासरपाॅर याच्याकडून ७-८ असा पराभव पत्करावा लागला होता. अर्जुनला पराभूक करत नासरपाॅर याने अंतिम फेरीत प्रवेश केला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.