नवी दिल्ली – भारताचा स्टार बुद्धिबळपटू अर्जुन इरिगेसी याने टाटा स्टील चॅलेंजर्स बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा जिंकणारा पी. हरिकृष्णा, बी. अधिबन आणि विदित गुजरातीनंतरचा तो चौथा भारतीय बुद्धिबळपटू ठरला.
या स्पर्धेच्या 12 फेऱ्यांत अर्जुनने 9.5 गुण मिळवले. त्यामुळे अखेरची फेरी बाकी असतानाच त्याचे विजेतेपद निश्चित झाले. अर्जुनने चॅलेंजर्स स्पर्धेत चमकदार कामगिरी करताना सात सामने जिंकले, तर त्याला पाच सामन्यांत बरोबरीवर समाधान मानावे लागले.
♟💙 | Arjun Erigaisi wins the #TataSteelChess Challengers Tournament! Congratulations! pic.twitter.com/6wLV4ieJe7
— Tata Steel Chess (@tatasteelchess) January 29, 2022
या विजेतेपदामुळे तो स्पर्धेच्या पुढील वर्षीच्या मोसमासाठीही थेट पात्र ठरला आहे. तसेच या कामगिरीच्या जोरावर त्याने जागतिक क्रमवारीत अव्वल 100 खेळाडूंमध्येही प्रवेश मिळवला आहे.