“तूफान’च्या दोन गाण्यांना अरिजीत सिंहचा आवाज

“भाग मिल्खा भाग’च्या यशानंतर फरहान अख्तर आणि दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांची जोडी पुन्हा एकत्रित येत इंस्पिरेशनल स्पोर्टस ड्रामा “तूफान’मध्ये काम करत आहे. आता चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली असून निर्मात्यांनी दोन लव्ह गाण्यांसाठी गायक अरिजीत सिंहला साइन केले आहे.

राकेश ओमप्रकाश मेहराच्या सर्व चित्रपटांमध्ये संगीताने नेहमीच अविभाज्य भूमिका निभावली आहे. म्हणूनच “तूफान’ अल्बममध्येही 6 गाण्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, एका प्रेरणादायक स्पोर्टस ड्रामा चित्रपटात एक प्रेमकथा आणि त्यात दोन रोमॅंटिक गाण्यांचा समावेश आहे.

ही गाणी कथेला अतिशय सुंदरपणे जोडतात. यातील एक गाणे शंकर एहसान लॉय, तर दुसरे गाणे शमुएल शेट्टी आणि आकांक्षा नांद्रेकर यांनी संगीतबद्ध केले आहे. निर्माता रितेश सिधवानी म्हणाले की, “तूफान’ चित्रपटात प्रेम कथा ही एक महत्त्वपूर्ण प्रेरक शक्‍ती आहे आणि अरिजीतद्वारा गायलेली दोन गाणी कथेला आणखीन मजबूत करतात. या दोन गाण्यांसाठी अरिजीतला सहभागी करून घेणे योग्य असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, फरहान अख्तरच्या या आगामी चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये आतापासून उत्सुकता निर्माण झाली आहे. हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.