Arijit Singh | गायक अरिजित सिंह याचा भारतासह देशभरात मोठा चाहता वर्ग आहे. त्याच्या गाण्याची तरुण वर्गात मोठी क्रेझ आहे. त्याच्या कॉन्सर्टला देखील मोठी गर्दी पाहायला मिळते. सध्या त्याचा युके कॉन्सर्टमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात अरिजित सिंह एका चाहतीची माफी मागताना दिसत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये अरिजित स्टेजवर परफॉर्म करत आहे. त्यादरम्यान एक चाहती त्याच्याकडे जाताना दिसते. मात्र, त्याच्या बॉडीगार्डने तिला थांबवले. ती त्याला सांगण्याचा प्रयत्न करते की अरिजित तिला आणि इतरांना हस्तांदोलनासाठी बोलवत होता. मात्र, बॉडीगार्डने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि तिला बाजूला ढकलले. हा प्रकार लक्षात येताच अरिजित सिंह त्या तरुणीची माफी मागतो. Arijit Singh |
This is not fair said @arijitsingh
When security grabbed a fan girl by the neck.. on the spot Arijit Singh said the guard. ❤️#UK Concert.Follow uss for more Updates.@Atmojoarjalojo @RockOnMusicLtd @OfficialTMTM #ArijitSingh #Security #fans #arijitsinghlive @BBCNews pic.twitter.com/nbvbV3XnLs
— The Arijitians (@thearijitians_) September 25, 2024
अरिजित सिंहने म्हटले, “कोणाला तरी अशापद्धतीने पकडणे अयोग्य आहे, मी तुम्हाला विनंती करतो कृपया बसून घ्या. मला माफ करा मॅडम, तुमचे संरक्षण करण्यासाठी मी तिथे असायला पाहिजे होतो, मात्र मी तिथे नव्हतो. कृपया बसून घ्या.” त्याच्या या वागण्याचे चाहत्यांनी ओरडून कौतुक केले. Arijit Singh |
दरम्यान, याआधी देखील अरिजित सिंहच्या लंडन कॉन्सर्टमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये अरिजित स्टेजवर चाहत्यांनी ठेवलेले खाद्यपदार्थ स्वत: उचलत होता. “मला माफ करा, हे माझे मंदिर आहे, तुम्ही इथे अशाप्रकारे अन्न ठेऊ शकत नाही”, अशी त्याने त्याच्या चाहत्यांना विनंती केली होती. अरिजितचा हा नम्र स्वभाव चाहत्यांना खूप आवडतो.