पुणेः घरातून न सांगता निघून गेलेल्या पत्नीचा एकत्र शोध घेत असताना झालेल्या वादातून दाजीनेच आपल्या मेव्हाण्याच्या डोक्यात लाकडी बांबूने वार करून खून केला. ही घटना मंगळवारी अल्पबचत भवना समोरील क्वीन्स गार्डन मधील झाडीत रेल्वे पटरीच्या बाजूला घडली.
अक्षय दिनेश कुलकर्णी (रा.कोथरुड) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी आरोपी दाजी संतोष मंचाराम चव्हाण (वय.25,मुळ नागपूर, सध्या दारुवाला पुल) याला ताब्यात घेतलेले आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीने स्वत: खून केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.