पुणे – पिंपरी चिंचवड येथील उड्डाणपुलाचे काम करणाऱ्या कंपनीच्या कामगार वसाहतीत दोन कामगारांमध्ये रात्री जेवण झाल्यानंतर भांडी घासण्याच्या कारणावरून झालेल्या मित्राच्या हत्येच्या आरोपातून एकाची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
अनिल महावीर खाडिया असे निर्दोष मुक्तता केलेल्याचे नाव आहे. आरोपीतर्फे ॲड. राकेश सोनार यांनी न्यायालयात कामकाज पाहिले. बांधकाम कंपनीचे मॅनेजर यांनी सांगवी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती. आरोपी तर्फे ॲड. राकेश सोनार यांनी आरोपीची बाजू मांडताना न्यायालयात हे निदर्शनास आणून दिले की, सरकार पक्षातर्फे व तपास अधिकारी यांनी सदरच्या गुन्हा कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार न्यायालयात तपासले गेले नाही.
तपासात अशा कुठल्याच प्रकारचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब नोंदवले नाही, आरोपी यांनी त्याचा मित्र अकबर सिंग यांच्यासमोर दिलेला कबुली जबाब हा हा पुरावा आरोपीस शिक्षेसाठी भक्कम असा पुरावा नाही, तसेच न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचा आलेला सर्व वैज्ञानिक पुरावे पाहता आरोपीने गुन्हा केल्याचा सिद्ध होत नाही. अँड. राकेश सोनार यांनी केलेला युक्तिवाद गृहीत धरून न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
या प्रकरणात ॲड. राकेश सोनार यांना ॲड. महेश देशमुख, उमंग यादव, प्रज्वल पवार, शाक्य सुवी, कुमार खराडे, ऋत्विक जाधव, ॲड. अनिल भानवसे, ॲड. अविनाश खुडे यांनी सहकार्य केले.