पॅरिस – फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत शुक्रवारी अर्जेन्टिनाच्या दीएगो श्वार्त्झमन याने आपली आगेकूच कायम राखली. त्याने स्पर्धेच्या पुरुष एकेरीत चौथ्या फेरीत थाटात प्रवेश केला. त्याने तिसऱ्या फेरीच्या लढतीत बल्गेरियाचा मानांकित टेनिसपटू ग्रीगोर दीमित्रोव्हवर 6-3, 6-1, 6-2 अशी सरळ तीन सेमध्ये सनसनाटी मात केली.
पुरुषांमध्ये डॅनियल मेदवेदेव व राफेल नदाल यांनी आगेकूच केली, तर महिलांमध्ये अग्रमानांकित इगा स्वेटेकनेही विजयी वाटचाल कायम राखली. चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिस्कोव्हालाही नवोदित लिओलिया जिनजिनकडून 2-6, 2-6 अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला.
चीनच्या क्विन्वेन झेंगने माजी विजेत्या सिमोना हालेपचा 2-6, 6-2, 6-1 असा पराभव केला. शेल्बी रॉजर्सने कॉलिन्सला 6-4, 6-3 असे पराभूत करत अशी धूळ चारली. स्वेटेकने अमेरिकेच्या ऍलिसन रिस्केचा 6-0, 6-2 असा पराभव केला.
पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत मेदवेदेवने सर्बियाच्या लास्लो देरे याच्यावर 6-3, 6-4, 6-3 अशी मात केली. 21 ग्रॅंडस्लॅम विजेत्या नदाल याने कॉरेंटीन मॉटेटचा 6-3, 6-1, 6-4 असा पराभव केला. कार्लोस अल्कराझने तब्बल पाच सेटपर्यंत चाललेल्या मॅरेथॉन लढतीत स्पेनच्या अल्बर्ट रामोस-व्हिनोलासला 6-1, 6-7, 5-7, 7-6, 6-4 असे नमवले.