सध्या सोशल मीडियावर अनेक व्हीडियो व्हायरल होतात. मात्र टीव्ही रिपोर्टरचा मोबाईल चोरी गेल्याचा व्हीडियो सध्या चांगलाच गाजतो आहे. टीव्ही रिपोर्टर रिपोर्टींगसाठी तयार होत असताना एका चोराने त्या रिपोर्टरचा मोबाईल खेचला आणि पळून गेला. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
अर्जेंटीनामध्ये हा प्रकार घडला. तो व्हीडियो सोशल मीडियावर शेअर होताच तुफान व्हायरल झाला आहे. डिएगो डेमारको असं या रिपोर्टरचं नाव आहे. सारंडी या शहरातून रिपोर्टींग करत असल्याचं समजतंय. डेमारको न्यूज़ स्टेशनसाठी रिपोर्टींग करत होते. रिपोर्ट शुट करण्यासाठी कॅमेरा रोल केला. ते पुढचं काम करण्यासाठी तयार होताच. एका माणसाने मोबाईल जोरात खेचला आणि पळून गेला.
त्यानंतर रिपोर्टने त्याचा पाठलाग केला. माझा फोन मला दे असं स्पॅनिश मध्ये म्हणाला. एल नुवे यांनी हा व्हीडियो फुटेज सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यानंतर हा व्हीडियो प्रचंड लोकांनी पाहिला अनेकजण व्हीडियो पाहून सजग झाले. तर अनेकांनी खिल्ली उडवली.