अरेना, लायन्स्‌ संघांचे सलग दोन विजय

पुणे: हॉटफूट स्पोर्टस्‌ अकादमी तर्फे आयोजित पाचव्या वर्षी अपोलो हॉटफुट युवा साखळी आंतर अकादमी फाईव्ह-अ-साईड फुटबॉल स्पर्धेच्या 12 वर्षाखालील गटात अरेना स्पोर्टस्‌ ऍकॅडमी, 4 लायन्स्‌ अकादमी आणि फन फिटनेस या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून स्पर्धेत सलग दोन विजयांची नोंद केली.

हॉटफुट अकादमीच्या कोरेगाव पार्क येथील मैदानावर झालेल्या या स्पर्धेच्या 12 वर्षाखालील गटात अरेना स्पोर्टस्‌ अकादमीच्या अ संघाने सलग दोन विजय मिळवले. अरेना स्पोर्टस संघाने आयोजक हॉटफुट अकादमी संघाचा 8-3 असा सहज पराभव केला. 5 गोलांच्या फरकाने मिळवलेल्या विजयात संघाच्या जोहान विनोद याने सर्वाधिक 3 गोल तर, संजीत डिआझ आणि इशा लोपेझ यांनी प्रत्येकी 2 गोल केले.

दुसऱ्या सामन्यात अरेना स्पोर्टस्‌ अकादमीने बेटा स्पोर्टस्‌ अकादमीचा 5-1 असा सहज पराभव केला. याच गटात 4 लायन्स्‌ अकादमीने सलग दोन विजयाची किमया केली. पहिल्या सामन्यात 4 लायन्स्‌ संघाने अरेना स्पोर्टस्‌ अकादमी ब संघाचा 6-0 असा सहज पराभव केला. दुसऱ्या सामन्यात 4 लायन्स्‌ अकादमीने स्टार फुटबॉल अकादमीचा 3-0 असा पराभव केला. या सामन्यात इशान चतुर, श्रीराज मनचोजी, अव्यक्त गुरूवेल्ली यांनी प्रत्येकी एकेक गोल केला.

10 वर्षाखालील गटामध्ये फन फिटनेस अकादमीने इएनएनएस बोर्डींग 8-2 असा तर, स्टार फुटबॉल अकादमी संघावर 5-0 असा एकतर्फी विजय मिळवला. दोन्ही सामन्यांमध्ये परम भार्गवा, नील जागळे, राजवीर सिंग, निमिश गोएल, सार्लेश राम या खेळाडूंनी गोलपूर्ण कामगिरी केली. दिएगो ज्युनिअर ब संघाने अमन सेतू स्कूलचा 11-0 असा धुव्वा उडविला. या सामन्यात इशान चतुर याने अर्धा डझन गोल मारले. पण पुढील सामन्यात दिएगो संघाला आपला फॉर्म कायम ठेवता आला नाही. हॉटफुट अकादमीने दिएगो संघाचा 8-1 असा सहज पराभव केला.

Leave A Reply

Your email address will not be published.