मुंबई – रणवीर कपूर दीपिका पदुकोण ही बॉलिवूडमधील फेमस जोडी बऱ्याच दिवसांनी सोबत दिसून आली. एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान रणवीर दीपिका रेड कार्पेटवर मीडियाला अटेंशन देताना दिसून आले. यावेळी दोघांचाही अंदाज पाहण्यासारखा होता. दोघांनीही एकमेकांच्या हातात हात घालून मीडियाला पोज देखील दिल्याचे दिसून आले.
रणवीर कपूर आपल्या अतंरंगी पोषाखासाठी तर दीपिका आपल्या नो मेकअप आणि सुदर लूकसाठी ओळखली जातो. पुरस्कार सोहळ्यासाठी या कपलने केलेला त्यांचा पोशाख चांगलाच लक्षवेधी ठरत आहे. रणवीरने शायनिंग ब्लॅक ब्लेझर आणि दीपिकाने रेड ड्रेस परिधान केल्याचे दिसून आले. सर्वांच्या नजरेत भरत होता तो रणवीरने गळ्यात घातलेल्या चेन्सचा सेट. म्हणूनच रणवीर दीपिकाचा या वेळेसचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
View this post on Instagram
अनेकांनी रणवीरच्या या लूकबाबत त्याला ट्रोल केले आहे. गळ्यात घातलेल्या चेनमुळे युजरने त्याला बायकोचा नेकलेस घातलाय का ? असा सवाल विचारला आहे.चाहत्यांनी या व्हडिओवर जोरदार कमेंटबाजी केली आहे.अनेकांनी दीपिकाच्या लूकचे कौतुक करत थेट तिला डायट प्लॅनबद्दल माहिती विचारली आहे.