मुंबई : उत्तराखंडचे नवनियुक्त मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिलांच्या कपड्यांसंदर्भात एक वक्तव्य करून नवा वाद ओढवून घेतला आहे. गुडघ्यावर फाटलेल्या जीन्स घालणाऱ्या महिला आपल्या स्वतः च्या मुलांना काय संस्कार देणार असे म्हणत रावत नवा वाद निर्माण केला आहे. देहरादून येथील एका कार्यक्रमात बोलत होते.
“…पण फाटक्या जीन्स वापरण्याला माझा विरोधच”; वादानंतरही तीरथ सिंह रावत भूमिकेवर ठाम
त्यांच्या या विवादित विधानावर बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांची नातं नाव्या नंदाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर करत त्यांचा या विधानाचा विरोध केला होता. तर आता आता नव्या नवेलीची आजी आणि राज्यसभा खासदार जया बच्चन यांनीही तीरथ सिंह यांच्या या विधानाचा समाचार घेतला आहे.
Such statements don’t befit a CM. Those on higher posts must think & make public statements. You say such things in today’s times, you’ll decide who’s cultured & who’s not based on clothes! It’s bad mindset & encourages crimes against women: SP MP Jaya Bachchan on Uttarakhand CM pic.twitter.com/QsdjGRU43d
— ANI (@ANI) March 18, 2021
जया बच्चन म्हणाल्या,’एका मुख्यमंत्र्याना असे विधान करणे शोभत नाही. मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलेल्या लोकांनी काहीही बोलण्याआधी विचार करायला हवा. लोकांच्या कपडयांवरून तुम्ही त्यांची संस्कृती ठरवणार आहात का? ही एक घाणेरडी विचारवृत्ती आहे. अशा विचारांमुळेच महिलांवरच्या अत्याचारात वाढ होतेय, अशी प्रतिक्रिया जया बच्चन यांनी दिली.
दरम्यानं, सर्वच स्तरातून टीका होत असताना रावत यांना त्यांच्या विधानाबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपला महिलांनी फाटक्या जीन्स वापरण्याला विरोध कायम असल्याचे म्हटले. “माझा महिलांनी जीन्स वापरण्याला विरोध नाही. पण, फाटक्या जीन्स वापरण्याला माझा विरोधच आहे,” असे रावत यांनी म्हटलं आहे.