Yesmadam Layoff | स्टार्टअप कंपनी ‘येस मॅडम’ सध्या इंटरनेटवर चर्चेत आहे. ही एक होम सलून सर्व्हिस कंपनी आहे. एका माजी कर्मचाऱ्याने कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत की, मानसिक आरोग्य सर्वेक्षणाच्या आधारे सुमारे 100 लोकांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. या घटनेने सोशल मीडियावर प्रचंड खळबळ उडाली असून लोक आता कंपनीच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत आहेत. सोशल मीडियावर शेअर झालेल्या ई-मेल स्क्रीनशॉटवरून ही गोष्ट समोर आली आहे.
येसमॅडम ही दिल्ली-NCR येथील कंपनी आहे, जी घरी येऊन सलून सेवा देते. कंपनीवर असा आरोप करण्यात येत आहे की, त्यांनी कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याबाबत एक सर्व्हे केला. या सर्व्हेत ज्या कंपन्यांनी तणाव असल्याचे मान्य केले त्यांना नोकरीवरून काढून टाकले. कंपनीने १००हून अधिक कर्मचाऱ्यांवर अशी कारवाई केली आहे. Yesmadam Layoff |
एका माजी कर्मचाऱ्याने सांगितले की, कंपनीने अंतर्गत मानसिक आरोग्य सर्वेक्षण केले. त्याचा उद्देश कर्मचाऱ्यांची मानसिक स्थिती आणि कामाचा दबाव समजून घेणे हा होता. परंतु या सर्वेक्षणाच्या निकालांच्या आधारे, ज्या कर्मचाऱ्यांनी कामाच्या दबावाची तक्रार केली त्यांना काढून टाकण्यात आले. कर्मचारी आणि इंटरनेट वापरकर्त्यांनी कंपनीचे हे पाऊल अमानवी असल्याचे म्हटले आहे. मानसिक आरोग्यावर संभाषणाला प्रोत्साहन देण्याऐवजी त्याचा वापर कर्मचाऱ्यांविरुद्ध करणे चुकीचे आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. Yesmadam Layoff |
काय म्हटले व्हायरल मेलमध्ये ?
सोशल मीडियावर YesMadamच्या एचआर मॅनेजरने पाठवलेल्या ई-मेलचा स्क्रीनशॉट फार व्हायरल होत आहे. या मेलमध्ये कंपनीकडून कर्माचाऱ्यांच्या स्ट्रेस सर्व्हेच्या आधारावर निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. प्रिय टीम, आम्ही कामातील तणावाबाबत तुमच्या भावना समजून घेण्यासाठी एक सर्व्हे केला होता. ज्यात तुमच्यापैकी अनेकांनी आपली काळजी व्यक्त केली होती. या गोष्टीला आम्ही फार महत्त्व देतो आणि त्याचा सन्मान करतो. Yesmadam Layoff |
आरोग्याच्या दृष्टीने आणि कामासाठीच्या पोषक वातावरणाला प्रोत्साहन देण्यासाठी कंपनी नेहमीच प्रयत्नशील आहे. तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियांचा आम्ही फार काळजीपूर्वीक विचार करत आहोत. कोणताही कर्मचारी तणावात राहू नये यासाठी आम्ही तणावात असलेल्या कर्मचाऱ्यांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय तातडीने लागू होत आहे. ज्या कर्मचाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे त्यांना स्वतंत्रपणे तपशील पाठवला जाईल. तुम्ही दिलेल्या योगदानासाठी धन्यवाद. आपला HR मॅनेजर, YesMadam.’ Yesmadam Layoff |
सध्या ही बाब सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. अनेक लोक कंपनीवर टीका करत आहेत आणि मानसिक आरोग्याच्या मुद्द्यावर खिल्ली उडवल्याचे म्हणत आहेत. एका यूजरने लिहिले की, जर कंपन्या मानसिक आरोग्याच्या नावाखाली टाळेबंदी करत असतील तर त्यांच्या मानसिक स्थितीबद्दल कोणीही प्रामाणिकपणे बोलणार नाही. त्याच वेळी, काही वापरकर्त्यांनी याला कॉर्पोरेट जगतातील वाढत्या दबावाचे उदाहरण म्हटले आहे.
हेही वाचा: